पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, महाराष्ट्र शासनाच्या एका विभागात रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत अर्ज करता येणार आहे.
कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय, पुणे येथे वरिष्ठ संशोधन फेलो (SRF) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे.
यामध्ये मुलाखतीच्या माध्यमातून संबंधित उमेदवाराची निवड केली जाणार आहे. सदर मुलाखत ही 21 एप्रिल 2026 रोजी ICAR-कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, पुणे महाराष्ट्र – 410505 येथे घेतली जाणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.dogr.res.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


