पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड-अलिबाग येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड-अलिबाग येथे वैद्यकीय समन्वयक, डायलिसिस तंत्रज्ञ या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला रायगड येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 10 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२६ ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 28000 रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, प्रशासकीय कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग, मुख्य डाकघर समोर, बीच रोड अलिबाग जि. रायगड पिन-४०२ २०१ येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. ३१ मार्च २०२६ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असल्याने इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करण्याचा सल्ला दिला जात आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://raigad.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


