पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे रिक्त पदावर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे येथे कार्यालयीन सहाय्यक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला ठाणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल 2026 ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 25000 रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. 13 एप्रिल 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असल्याने इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करण्याचा सल्ला दिला जात आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://thane.dcourts.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : कार्यालयीन सहाय्यक.
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.
– नोकरीचे ठिकाण : ठाणे.
– वेतन / मानधन : दरमहा २५००० रुपये.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 07 एप्रिल 2026.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 एप्रिल 2026.
– अर्ज सादर करण्याचा / पाठवण्याचा पत्ता: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा व सत्र न्यायालय, ठाणे.


