Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Job News ! राष्ट्रीय आरोग्य अभियान येथे नोकरीची संधी; अनेक रिक्त पदे भरली जाणार…

Job News ! राष्ट्रीय आरोग्य अभियान येथे नोकरीची संधी; अनेक रिक्त पदे भरली जाणार…

पुणे : राष्ट्रीय आरोग्य अभियान येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी ९ एप्रिल २०२६ रोजी मुलाखत द्यावी लागणार आहे.

जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान येथे बालरोगतज्ज्ञ, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : बालरोगतज्ज्ञ, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी.
– एकूण रिक्त पदे : 15 पदे.

– नोकरीचे ठिकाण : छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
– वयोमर्यादा : ७० वर्षांपर्यंत.

– वेतन / मानधन : दरमहा रु. 75,000 पर्यंत.
– अर्ज शुल्क : खुल्या वर्गासाठी: रु. ५००/- आणि राखीव वर्गासाठी: रु. २५०/-.

– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : ०९ एप्रिल २०२६.

– मुलाखतीचा पत्ता : डेटा सेंटर, सिटी मार्बल बिल्डिंग, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर.

– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://chhsambhajinagarmc.org/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!