Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ashok Kharat Case: चाकणकरांना चौकशीला कधी बोलावणार? सुषमा अंधारेंच्या सवालवर SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी दिलं ‘हे’ उत्तर

Ashok Kharat Case: चाकणकरांना चौकशीला कधी बोलावणार? सुषमा अंधारेंच्या सवालवर SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी दिलं ‘हे’ उत्तर

Ashok Kharat Case : स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू अशोक खरात याच्या लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या प्रकरणाला आता राजकीय वळण लागले आहे. या प्रकरणात समोर आलेल्या बड्या राजकीय नावांची चौकशी कधी होणार, असा प्रश्न राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे. यावर एसआयटी (SIT) प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “तपासात निष्पन्न होणाऱ्या पुराव्यांच्या आणि साक्षीदारांच्या माहितीच्या आधारेच पुढील कायदेशीर पावले उचलली जातील.”

राजकीय वादंग आणि सुषमा अंधारेंची तोफ
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अशोक खरातच्या मोबाईलचा सीडीआर (CDR) जाहीर केल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. यामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री दीपक केसरकर यांची नावे चर्चेत आली. यावरून शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी आक्रमक पवित्रा घेत, “खरातच्या संपर्कात असलेल्या या बड्या नेत्यांना एसआयटी चौकशीसाठी कधी बोलावणार?” असा थेट सवाल प्रशासनाला विचारला. या राजकीय आरोप-प्रत्यारोपामुळे प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे.

तेजस्वी सातपुते यांचे प्रत्युत्तर आणि पुराव्यांवर भर
पत्रकार परिषदेत राजकीय चौकशीच्या प्रश्नाला उत्तर देताना सातपुते म्हणाल्या की, आतापर्यंत दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये जे साक्षीदार समोर आले आहेत, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आमचा तपास सुरू आहे. गेल्या 17 दिवसांपासून एसआयटी रात्रंदिवस काम करत असून, तपासात आवश्यकता भासल्यास संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी बोलावले जाईल. तसेच, अंजली दमानिया यांनी समोर आणलेल्या सीडीआर (CDR) माहितीच्या लीक प्रकरणाची शासन स्तरावर स्वतंत्र चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दैवी शक्तीचा बनाव आणि सायबर कारवाई
तपासातील प्रगतीबाबत माहिती देताना सातपुते यांनी सांगितले की, खरातने खडे, चिंचोके आणि रुद्राक्ष देऊन लोकांच्या मनात मृत्यूची भीती निर्माण केली होती. स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासवून त्याने अनेक महिलांचे शोषण केले. ईशानेश्वर मंदिरातील अंधाराचा फायदा घेऊन तो ‘हातचलाकी’ करायचा, हे आता तपासात स्पष्ट झाले आहे. पीडित महिलांच्या गोपनीयतेसाठी सायबर टीमने आतापर्यंत 4,650 आक्षेपार्ह व्हिडिओ लिंक्स ब्लॉक केल्या असून, हे व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या 6 जणांना अटकही करण्यात आली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!