पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, मुंबईतील एका शासकीय विभागात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये काही रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च, मुंबई येथे सल्लागार (प्रशासन/खरेदी), सल्लागार (वित्त व लेखा), सल्लागार (स्थापत्य) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत तीन रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २ एप्रिल २०२६ ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, त्यासाठी कुलसचिव, सोसायटी फॉर अप्लाईड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च, आयआयटी कॅम्पस, हिल साईड, पवई, मुंबई ४०००७६ येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.sameer.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सल्लागार (प्रशासन/खरेदी), सल्लागार (वित्त व लेखा), सल्लागार (स्थापत्य).
– एकूण रिक्त पदे : 03 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (ई- मेल) / ऑफलाइन (स्पीड पोस्टने / वैयक्तिकरित्या)..
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : २ एप्रिल २०२६.
– अर्ज सादर करण्याचा / पाठवण्याचा पत्ता : कुलसचिव, सोसायटी फॉर अप्लाईड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च, आयआयटी कॅम्पस, हिल साईड, पवई, मुंबई ४०००७६.
– अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी : recruitments@sameer.ac.in


