मुंबई : सध्या अनेक सिनेमा रिलीज होताना दिसत आहेत. त्यातच आता चित्रपटप्रेमी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला आहे. ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हा गुरुवारी (दि.19) रिलीज झाला. या सिनेमाची क्रेझ सोशल मीडियावर दिसून येत आहे. पहिल्या भागामुळे निर्माण झालेल्या प्रसिद्धीचा दुसऱ्या भागाला फायदा झाला आहे. ‘धुरंधर २’ ने बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ओपनिंग केली.
डिसेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ला हिट बनवण्यात अक्षय खन्नाने महत्त्वाची भूमिका बजावली. दरोडेखोर रहमानची भूमिका साकारताना त्याच्या पात्राने निर्माण केलेला प्रभाव क्वचितच पाहायला मिळतो. खलनायक असूनही, तो चित्रपटात नायकासारखा चमकतो. धुरंधरमधील त्याचा मृत्यूचा सीनही खूप भयानक होता. आता, ‘धुरंधर २’ मध्ये दरोडेखोर रहमानच्या मृत्यूवर शोक होतो. ज्यासाठी कलाकारांनी खास पद्धतीने तयारी केली आहे.
अलीकडेच, रहमान डाकूच्या टोळीतील एका पंचरची भूमिका साकारणाऱ्या या चित्रपटातील अभिनेता रजत अरोरा याने याची माहिती दिली. तिथे त्याने रहमान डाकूच्या अंतिम निरोपाच्या सीनमागील कहाणी सांगितली, ज्यासाठी त्याला आदित्य धर यांच्याकडून एक विशेष सूचना मिळाली होती. आदित्य धर यांनी रजतला रहमान वडिलांसारखा असल्याचे मानूनच रडा, अशा सूचनाच दिल्या होत्या.
जेव्हा तुमच्या वडिलांचे निधन होईल तेव्हा तुम्हाला कसे वाटेल? तुम्हाला त्याच भावना आणि संवेदना पडद्यावर आणायच्या आहेत. जणू काही तुमचे वडील वारले आहेत, अशाप्रकारे तुम्हाला रडायचे आहे, असे म्हटल्यानंतर हा सीन चांगला झाल्याचे त्यांनी सांगितले.


