पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, खोपोली नगरपरिषद येथे रिक्त पदावर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
खोपोली नगरपरिषद येथे वैद्यकीय अधिकारी या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला खोपोली, रायगड येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत सहा रिक्त पद भरले जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
सदर मुलाखत ही 6 एप्रिल 2026 रोजी घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.mckhopoli.org/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी.
– एकूण रिक्त पदे : 06 पदे.
– नोकरीचे ठिकाण : खोपोली, रायगड.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : ऑफलाईन.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 06 एप्रिल 2026.
– मुलाखतीचा पत्ता : खोपोली नगरपरिषद नवीन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, (गुडलक चौक, बासरंग रोड).


