पुणे : बँकेत नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, अकोला येथील एका बँकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
दि अग्रसेन नागरी सहकारी बँक लि., अकोला येथे आय. टी. व्यवस्थापक, संगणक अभियंता या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला अकोला येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : आय. टी. व्यवस्थापक, संगणक अभियंता.
– नोकरीचे ठिकाण : अकोला.
– शैक्षणिक पात्रता : बी. ई. कॉम्प्युटर/बी.टेक/ई अॅड टी.सी./एम.सी.ए /एम.सी.एस./एम.एस.सी. कॉम्प्युटर (मूळ जाहिरात वाचावी)
– वयोमर्यादा : २५ ते ४० वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : १ नोव्हेंबर २०२५.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : अग्रसेन नागरी सहकारी बँक लिमिटेड, अकोला, २६, एमजी आरडी, न्यू राधाकिसन प्लॉट्स, निमवाडी, अकोला, महाराष्ट्र ४४४००१.


