पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, बृहन्मुंबई महानगरपालिका रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 110000 रुपयांपर्यंत पगार मिळू शकणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 33 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 सप्टेंबर 2025 ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, त्यासाठी डिस्पॅच विभाग, टी. एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटलचा तळमजला, मुंबई-४००००८ येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://portal.mcgm.gov.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक.
– एकूण रिक्त पदे : 33 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 80,000/- ते रु. 1,10,000/- पर्यंत.
– वयोमर्यादा : ३८ वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०३ सप्टेंबर २०२५.


