पुणे : नाशिक येथील केंद्रीय विद्यालयात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी १५ ऑक्टोबर २०२५ रोजी मुलाखत द्यावी लागणार आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे, मनमाड येथे टी.जी.टी (इंग्रजी/ संस्कृत/ जीव विज्ञान, बालवाटिका शिक्षक, व्यावसायिक प्रशिक्षक, काऊंसलर यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मनमाड, नाशिक येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : टी.जी.टी (इंग्रजी/ संस्कृत/ जीव विज्ञान, बालवाटिका शिक्षक, व्यावसायिक प्रशिक्षक, काऊंसलर
– नोकरीचे ठिकाण : मनमाड, नाशिक
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : १५ ऑक्टोबर २०२५.
– मुलाखतीचा पत्ता : केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे, मनमाड, येवला रोड, कॅम्प क्षेत्र, ता- नांदगाव, जि. नाशिक – 423 104.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://manmad.kvs.ac.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


