Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Job Alert ! पिंपरी-चिंचवड येथे नोकरीची संधी; अनेक रिक्त पदे भरली जाणार, लवकर करा अर्ज…

Job Alert ! पिंपरी-चिंचवड येथे नोकरीची संधी; अनेक रिक्त पदे भरली जाणार, लवकर करा अर्ज…

पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, पिंपरी-चिंचवड महापालिकेत अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत कला शिक्षक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पिंपरी-चिंचवड येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 39 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2025 ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.

यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, त्यासाठी जुने ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा. पाटील महानगरपालिका प्राथमिक शाळा, पिंपरी गाव येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.pcmcindia.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया

– पदाचे नाव : कला शिक्षक.
– एकूण रिक्त पदे : ३८ पदे.

– नोकरीचे ठिकाण : पिंपरी, पुणे.
– वेतन/ मानधन : दरमहा रु. २८०००

– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 29 ऑगस्ट 2025.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 सप्टेंबर 2025.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!