नवी दिल्ली : प्रसिद्ध कंपनी AKAI ने भारतीय बाजारपेठेत आपला स्मार्ट टीव्ही आणला आहे. कंपनीने अँड्रॉइड १४ वर आधारित त्यांची AKAI Powerview सीरीज लाँच केली आहे. या सीरीजमध्ये कंपनीने ३२ इंच ते ७५ इंचापर्यंतच्या डिस्प्लेसह मॉडेल लाँच केले आहेत. कंपनीने वेगवेगळ्या स्क्रीन प्रकारांसह टीव्ही लाँच केले आहेत.
AKAI पॉवरव्ह्यू सीरीजमध्ये कंपनीने वेगवेगळ्या स्क्रीन साईजमध्ये टीव्ही लाँच केली आहे. कंपनी ३२ इंच एचडी डिस्प्ले, ४३ इंच, ५० इंच, ५५ इंच, ६५ इंच आणि ७५ इंच ४K QLED डिस्प्ले पर्यायांमध्ये येते. ४३ इंच आणि त्याहून अधिक स्क्रीन आकार असलेले टीव्ही १२०Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करत आहेत. ३२ इंच स्क्रीन मॉडेलमध्ये १.५GB RAM आणि 8GB स्टोरेज आहे. त्याच वेळी, ४३-इंच आणि मोठ्या स्क्रीन मॉडेल्समध्ये २GB RAM आणि 32GB स्टोरेज उपलब्ध आहे.
तसेच मोठ्या स्क्रीन मॉडेल्समध्ये डॉल्बी अॅटमॉस सपोर्ट देण्यात आला आहे. स्मार्ट टीव्हीमध्ये एचडीएमआय, यूएसबी, लॅन आणि ३.५ मिमी जॅक आहे. पॉवरव्ह्यू सीरीजमध्ये मीडियाटेक MT९६०३ प्रोसेसर आहे. त्यात गुगल असिस्टंट, मिराकास्ट, क्रोमकास्ट, पॅरेंटल कंट्रोल, फास्ट बूस्ट सारखी फीचर्स आहेत.
किंमत काय?
AKAI Powerview Series ची किंमत १३९९० रुपयांपासून सुरू होते. ही टीव्ही AKAI च्या अधिकृत प्लॅटफॉर्म आणि ऑनलाईन स्टोअर्सवरून ऑफलाईन खरेदी करता येऊ शकतील.


