पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, कोकण रेल्वे विभागात रिक्त पदावर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत आता अर्ज करता येणार आहे.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड येथे सहाय्यक साहित्य व्यवस्थापक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला बेलापूर, नवी मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे.
यामध्ये मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे. सदर मुलाखत ही एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि., सीवूड्स रेल्वे स्थानकाजवळ, सेक्टर-४०, सीवूड्स (पश्चिम), नवी मुंबई येथे घेतली जाणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.konkanrailway.com/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


