पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी, पुणे येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे.
आता पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी, पुणे येथे शिकाऊ-इलेक्ट्रिशियन या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 23 रिक्त पद भरले जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ ऑक्टोबर २०२५ ही असणार आहे.
संबंधित उमेदवाराची निवड ही परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. यामध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. औडा संवसु विभाग, पिंपरी चिंचवड (११ ऑक्टोबर २०२५) येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.mahatransco.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


