पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, नागपूरच्या विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था येथे रिक्त पदावर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर येथे ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2025 ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 37000 रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे.
यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, त्यासाठी punitbhavsar@ece.vnit.ac.in या ई-मेल आयडीवर अर्ज पाठवावा. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://vnit.ac.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


