Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune crime : “नातवाचा खून करून मला काय मिळणार?” बंडू आंदेकरचा कोर्टात जोरदार युक्तिवाद

Pune crime : “नातवाचा खून करून मला काय मिळणार?” बंडू आंदेकरचा कोर्टात जोरदार युक्तिवाद

पुणे : पुण्यातील नाना पेठ परिसरातील रक्तरंजित गँगवॉरला नवे वळण मिळाले आहे. वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्याचा भाचा असलेल्या १८ वर्षीय आयुष कोमकरला गोळ्या घालून ठार करण्यात आलेल्या प्रकरणात मुख्य आरोपी बंडू आंदेकरने कोर्टात सर्व आरोप फेटाळले. “माझ्या नातवाचा खून करून मला काय मिळणार? आयुष माझा वैरी आहे का?” असा सवाल उपस्थित करत बंडू आंदेकरने कौटुंबिक वाद आणि बदलेप्रमाणे आपले नाव गोवण्यात आल्याचा युक्तिवाद केला.

आज पुण्याच्या सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत १३ पैकी ८ आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, १५ सप्टेंबरला पुन्हा हजर करण्यात येणार आहेत. या प्रकरणाने आंदेकर टोळीच्या चार दशकांच्या रक्तरंजित इतिहासाला नव्याने उजागर केले आहे.

आयुष कोमकर (वय १८) हा वनराज आंदेकरचा भाचा आणि बंडू आंदेकरचा नातू होता. गेल्या वर्षी १ सप्टेंबर २०२४ रोजी वनराज आंदेकरची (NCP चे माजी नगरसेवक) नाना पेठेत गोळ्या आणि कोयत्याने हत्या झाली होती. या प्रकरणात आयुषचे वडील गणेश कोमकर, आई कल्याणी कोमकर (बंडूची मुलगी), चुलत भाऊ जयंत कोमकर आणि माजी आंदेकर टोळी सदस्य सोमनाथ गायकवाड यांच्यासह १६ जणांना अटक झाली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, हे कट संपत्ती वाद आणि अंतर्गत कलहमुळे रचले गेले होते.

या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने ५ सप्टेंबर २०२५ रोजी गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला आयुषला निशाना बनवले. आयुष क्लासवरून घरी परतत असताना लक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या बेसमेंट पार्किंगमध्ये दोन बाइकवर आलेल्या हल्लेखोरांनी “टपका रे टपका” या गाण्याच्या तालावर ९ ते ११ गोळ्या झाडल्या. त्यापैकी ३ गोळ्या लागल्याने आयुषचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोरांनी बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकरच्या नावाने घोषणा देऊन दहशत माजवली. आयुषची आई कल्याणीने फिर्याद दिली असून, समर्थ पोलिस स्टेशनात बंडू आंदेकरसह १३ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

“केरळमध्ये होतो, खोटे गुंतवले”, कोर्टात बंडू आंदेकरचा युक्तिवाद

आज सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत बंडू आंदेकर (वय ६८) आणि इतर आरोपींना हजर करण्यात आले. बंडूच्या वकिलांनी (प्रशांत पवार आणि मिथुन चवान) जोरदार युक्तिवाद करत म्हटले की, “आम्ही गेल्या १० तासांपासून अटकेत आहोत. हा गुन्हा चुकीचा आहे. कल्याणी ही बंडूची मुलगी आहे आणि फिर्यादी आहे, तर मयत आयुष हा नातू आहे. मी वनराज हत्याकांडात फिर्यादी आहे, त्यात मी कल्याणी आणि तिच्या कुटुंबीयांना कट रचल्याचा आरोप केला होता. आता त्याच बदला म्हणून मला या प्रकरणात गोवण्यात आले आहे.”

बंडूने कोर्टात सांगितले, “माझ्या नातवाचा खून मी का करू? मला काय मिळणार? आयुष माझा वैरी आहे का? हत्येच्या दिवशी (५ सप्टेंबर) मी केरळमध्ये होतो. वनराज हत्याकांडात मी कल्याणीच्या पती गणेश कोमकर, सासऱ्याचे आणि दीराचे नाव घेतले होते, म्हणून संपूर्ण कुटुंब जेलमध्ये पाठवण्याचा उद्देश आहे. हे सर्व कौटुंबिक वाद आहे, गुन्हेगारी नाही.” पोलिसांनी मात्र प्रतिवाद करत म्हटले की, “बंडू आणि त्याची टोळीच या हत्येचा मास्टरमाइंड आहे. हे वनराज हत्येचा स्पष्ट बदला आहे. पुरावे आणि साक्षीदार उपलब्ध आहेत.” सार्वजनिक अभियोक्ता दिलीप गायकवाड यांनी ७ दिवसांची पोलिस कोठडी मागितली, जी कोर्टाने मंजूर केली.

८ आरोपी अटक, उर्वरितांवर शोध

पुणे पोलिसांनी जलद कारवाई करत ८ आरोपींना अटक केली आहे. यात बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, शिवम आंदेकर, अभिषेक आंदेकर, शिवराज आंदेकर, वृंदावनी वाडेकर, स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर, अमन युसुफ पठाण (उर्फ खान) आणि यश सिद्धेश्वर पाटील यांचा समावेश आहे. बंडू आणि ३ साथींना बुलढाणा जिल्ह्यातून, तर २ ला पुण्यातून अटक करण्यात आली. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले, “हे प्रकरण वनराज हत्येचा बदला आहे. उर्वरित ५ आरोपींवर शोध सुरू आहे. MCOCA अंतर्गत कारवाईचा विचार सुरू आहे.”

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!