Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

लातूर जिल्हा पोलीस पाटील पदासाठी निघाली मेगा भरती; ऑनलाईन करता येणार अर्ज, त्यासाठी…

लातूर जिल्हा पोलीस पाटील पदासाठी निघाली मेगा भरती; ऑनलाईन करता येणार अर्ज, त्यासाठी…

पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, लातूर जिल्हा पोलीस पाटील पदासाठी रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

लातूर जिल्हा येथे पोलीस पाटील या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला लातूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 554 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जून २०२६ ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे.

यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://latur.gov.in/ या  अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : पोलीस पाटील.

– एकूण रिक्त पदे : 554 पदे.

– नोकरीचे ठिकाण : लातूर जिल्हा.

– शैक्षणिक पात्रता : एस.एस.सी (१० वी) उत्तीर्ण.

– वयोमर्यादा : दि. २६ जानेवारी २०२६ रोजी अर्जदाराचे वय २५ वर्षे ते ४५ वर्षे दरम्यान असावे.

– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन.

– अर्ज शुल्क: खुल्या वर्गासाठी : रु. 1000/- आणि आरक्षित / आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी -: रु. 800/-.

– अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० जून २०२६ २३.५९ वा. पर्यंत.

– अर्जाची छाननी आणि प्रवेशपत्र वाटप : ११ जून २०२६ ते १९ जून २०२६.

– लेखी परीक्षेची तारीख : २१ जून २०२६.

– लेखी परीक्षेचा निकाल : २२ जून २०२६.

– तोंडी परीक्षा (मुलाखती) आणि अंतिम निवड यादी : २४ जून २०२६ ते ०२ जुलै २०२६.

– नियुक्ती पत्र मिळण्याची तारीख : ०७ जुलै २०२६.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!