Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Job Alert ! महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा सोसायटी येथे मेगा भरती; घरबसल्या करता येणार अर्ज…

Job Alert ! महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा सोसायटी येथे मेगा भरती; घरबसल्या करता येणार अर्ज…

पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा सोसायटी येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये काही रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा सोसायटी, पुणे येथे वैद्यकीय अधिकारी (कंत्राटी तत्वावर) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 40 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०२५ ही असणार आहे. यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

जर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणार असाल तर प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी कार्यालय, तळमजला, पंचदीप भवन, वरिष्ठ क्रमांक ६८९/९०, बिबवेवाडी, पुणे-४११०३७ येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.esic.nic.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : कंत्राटी तत्वावर वैद्यकीय अधिकारी.
– एकूण रिक्त पदे : 40 पदे.

– नोकरीचे ठिकाण : पुणे
– शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस.

– वेतन / मानधन : दरमहा 75000 रुपये
– वयोमर्यादा : 69 वर्षांपर्यंत.

– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (ई- मेल) / ऑफलाइन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : २५ ऑक्टोबर २०२५.

– अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी कार्यालय, तळमजला, पंचदीप भवन, वरिष्ठ क्रमांक ६८९/९०, बिबवेवाडी, पुणे-४११०३७.

– निवड प्रक्रिया : मुलाखत
– मुलाखतीची तारीख : २८ ऑक्टोबर २०२५ सकाळी ११:०० ते दुपारी ४:०० वाजेपर्यंत

– मुलाखतीचा पत्ता : प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी कार्यालय, तळमजला, पंचदीप भवन, वरिष्ठ क्रमांक ६८९/९०, बिबवेवाडी, पुणे-४११०३७.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!