Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

फक्त एका मिनिटात ओळखता येईल भेसळयुक्त खवा; ‘या’ सोप्या टिप्स वापरून होईल फायदा…

फक्त एका मिनिटात ओळखता येईल भेसळयुक्त खवा; ‘या’ सोप्या टिप्स वापरून होईल फायदा…

दिवाळीचा सण आनंद आणि गोडवा घेऊन येतो. याच दिवसात बाजारपेठेत मिठाईची भरभरून खरेदी केली जाते. अनेकदा भेसळयुक्त पदार्थ आपल्याला मिळू शकतात. त्यामुळे काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. भेसळयुक्त खवा आता ओळखता येणं सोपं झालं आहे. फक्त काही टिप्स तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. नंतर तुम्हाला अडचणींपासून दूर राहता येऊ शकतं.

बनावट खव्यापासून बनवलेल्या मिठाई खाणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकते, म्हणून बनावट आणि खरा खवा यात फरक करणे अत्यंत महत्वाचे आहे. जर खवा तूप सोडत असेल आणि तळहातावर घासल्यावर गोड वास येत असेल तर तो असली आहे. जर तो बनावट असेल तर तो चिकट वाटेल. तसेच जर खवा गुंडाळल्यावर तुटू लागला किंवा फडफड करू लागला तर तो भेसळयुक्त आहे, कारण खरा खवा तुटत नाही. खव्याचा तुकडा गरम करा. जर तो तूप सोडू लागला तर तो असली आहे. जर त्यातून पाणी सोडले तर तो बनावट असल्याचे दिसून येऊ शकते.

याशिवाय, गरम पाण्यात खवा विरघळवा आणि आयोडीनचे काही थेंब घालावेत. जर खवा निळा झाला तर त्यात स्टार्चची भेसळ आहे. असली खवा तुमच्या तोंडात विरघळेल आणि त्याला सौम्य, दुधासारखी चव येईल. मात्र, नकली खवा तुमच्या तोंडाला चिकटू शकतो. यांसारख्या घरगुती टिप्स फॉलो केल्यास भेसळयुक्त खव्यापासून आपल्याला दूर राहता येऊ शकतं.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!