पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, राष्ट्रीय आरोग्य अभियान येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये काही रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, ठाणे येथे स्टाफ नर्स (जीएनएम, एएनएम) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला ठाणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत १४० रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑक्टोबर २०२५ ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी चौथा मजला, सार्वजनिक आरोग्य विभाग, ठाणे महानगरपालिका इमारत, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे (प.) ४००६०२ येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://thanecity.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
- पदाचे नाव : स्टाफ नर्स (जीएनएम, एएनएम).
- एकूण रिक्त पदे : 140 पदे.
- नोकरीचे ठिकाण : ठाणे.
- शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी नर्सिंग / जीएनएम / एएनएम.
- वेतन / मानधन : दरमहा रु. 18,000/- ते रु. 20,000/- पर्यंत.
- अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (गुगल फॉर्म), ऑफलाइन .


