मुंबई : टीव्हीवर अनेक रिअॅलिटी शो सध्या सुरु आहेत. त्यात सर्वात लोकप्रिय सिगिंग रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडल’ घराघरात पोहोचला आहे. आता हा शो एका नवीन सीझनसह परत येत आहे. शोचे प्रोमो प्रेक्षकांना चांगलेच पसंतीस पडत आहे. मात्र, आता हाच शो वादाचा विषय ठरला आहे.
‘इंडियन आयडल’चे परीक्षक विशाल ददलानी यांनी गायक दानिशचा भाऊ तबीशबद्दल एक गोष्ट शेअर केली. तबीशचा आवाज चांगला सुरेल आहे. तो यापूर्वी इंडियन आयडलचा भाग होता. पण नंतर बाहेर जावं लागले. गेल्या वेळी, तो शोमधून बाहेर जाताना आम्ही त्याला गाण्यास सांगितले होते, तेव्हा त्याने गाणे गायलेही. तेव्हा आम्ही भावूक झालो. पण नंतर प्रेक्षकांनी आम्हाला प्रश्न विचारले आणि ट्रोल केले. प्रेक्षकांनी आम्हाला हे प्लानड् असल्याचे म्हटले. इंडियन आयडल हे बोगस असल्याचे अनेकांनी म्हटले. त्यावर विशाल याने भाष्य केले.
विशाल ददलानीने ‘इंडियन आयडल हा शो पूर्णपणे खरा आहे. तो बोगस अथवा फसवा नाही’. विशाल ददलानीचे शब्द ऐकून बादशाहनेही भाष्य केले. ‘मी कॅमेऱ्यासमोर हे सांगू इच्छितो की, इथे काहीही स्क्रिप्ट लिहिलेले नाही. सर्व काही खरे आहे. जर ती स्क्रिप्ट लिहिलेले असती तर मी स्क्रिप्टनुसार वागलो नसतो’.


