पुणे : बँकेत नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, राष्ट्रीयीकृत बँक अशी ओळख असलेल्या भारतीय स्टेट बँकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
भारतीय स्टेट बँकेत मंडळ आधारित अधिकारी (CBO) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला देशभरात कुठंही जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 2273 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. एसबीआय सीबीओ परीक्षेची तारीख सध्या मार्च २०२६ पर्यंत घेतली जाईल, असे सांगण्यात येत आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव: मंडळ आधारित अधिकारी (CBO).
– रिक्त पदे : 2273 पदे (महाराष्ट्र: 204 पदे).
– नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– शैक्षणिक पात्रता : उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर.
– वयोमर्यादा : 21 ते 30 वर्षे.
– अर्ज शुल्क : General/ EWS/ OBC – रु. 750/-, SC/ ST/ PWD – Nil.
– अर्ज सुरू होण्याची तारीख : २९ जानेवारी २०२६.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : १८ फेब्रुवारी २०२६.
– एसबीआय सीबीओ परीक्षेची तारीख : मार्च २०२६ (तात्पुरते).
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.onlinesbi.sbi/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


