Today बुधवार, 22nd एप्रिल 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

सुवर्णसंधी ! महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात मिळू शकते नोकरी; ऑनलाईन करता येणार अर्ज…

सुवर्णसंधी ! महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात मिळू शकते नोकरी; ऑनलाईन करता येणार अर्ज…

पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात शिकाऊ उमेदवार (अप्रेंटिस) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 186 रिक्त पदे भरली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १ जानेवारी २०२६ ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.

यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, त्यासाठी नोंदणी आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.msrtc.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार (अप्रेंटिस).
– व्यवसाय नाव : मेकॅनिक- मोटार व्हेईकल, इलेक्ट्रीशियन, शिट मेटल वर्कर, मॅकेनिक (डिझेल), वेल्डर, मेकॅनिक मेकॉट्रोनिक्स, रेफ्रीजरेशन + एअर कंडीशनींग, पेन्टर, टर्नर, इन्स्टुर्मेन्ट मेकॅनिक (यांत्रिकी उपकरण)

– एकूण रिक्त पदे : 186 पदे.
– पात्रता : आय.टी.आय पास व एस.एस.सी. पास.

– नोकरीचे ठिकाण : छत्रपती संभाजीनगर.
– वेतन/ मानधन/ विद्यावेतन : दरमहा रु. 9,893/- ते रु. 11,133/- पर्यंत.

– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (नोंदणी).
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०१ जानेवारी २०२६.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!