Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime News : पुणे हादरले..! 16 वर्षीय मुलीवर 5 वर्षे लैंगिक अत्याचार, कपडे बदलताना फोटो काढून ब्लॅकमेल

Pune Crime News : पुणे हादरले..! 16 वर्षीय मुलीवर 5 वर्षे लैंगिक अत्याचार, कपडे बदलताना फोटो काढून ब्लॅकमेल

पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल पाच वर्षे लैंगिक अत्याचार करणाऱ्या संजय चिदंबरम कुलकर्णी (वय 44) याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. मुलीचे कपडे बदलताना गुप्तपणे फोटो काढून त्याद्वारे ब्लॅकमेल करत आरोपीने 2019 ते जुलै 2025 या कालावधीत तिच्यावर वारंवार अत्याचार केले. या प्रकरणाने पुणे शहर हादरले असून, शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी संजय कुलकर्णी हा पीडित मुलीच्या कुटुंबाचा परिचित होता. त्याने या परिचयाचा गैरफायदा घेत 2019 मध्ये, जेव्हा पीडिता फक्त 11 वर्षांची होती, तेव्हा तिचे कपडे बदलताना गुप्तपणे फोटो काढले. या फोटोंचा वापर करत त्याने मुलीला प्रसारित करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केले आणि सलग पाच वर्षे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याशिवाय, त्याने कारमध्येही तिचा विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी संजय चिदंबरम कुलकर्णी याला अटक केली. त्याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO) आणि भारतीय दंड संहितेच्या बलात्काराशी संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या आरोपीला न्यायालयात सादर करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

सुसंस्कृत पुण्यात प्रश्नचिन्ह

ही घटना पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात घडली असून, सुसंस्कृत आणि शिक्षणाचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करणारी आहे. समाजात संतापाची लाट उसळली असून, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!