Today गुरूवार, 1st ऑक्टोबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

प्रेयसीच्या सततच्या पैशांच्या मागणीनंतर मुंबईतील 22 वर्षीय तरुणाची आत्महत्या; प्रेयसीविरुद्ध गुन्हा दाखल

प्रेयसीच्या सततच्या पैशांच्या मागणीनंतर मुंबईतील 22 वर्षीय तरुणाची आत्महत्या; प्रेयसीविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई: प्रेयसीच्या सातत्यपूर्ण पैशांच्या मागणीमुळे त्रस्त झालेल्या मुंबईतील एका 22 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. सुमारे आठ महिन्यांच्या तपासानंतर, शिवाजी नगर पोलिसांनी प्रेयसीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 108 अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त माहितीनुसार, मृत तरुण गोवंडीतील बैगनवाडी परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत होता. तो बेलापूरमधील एका खाजगी कंपनीत काम करत होता. सुरुवातीला तो आपल्या आईला पगार देत असे, परंतु नंतर त्याने आईला पैसे देणे थांबवले. त्यानंतर त्याच्या आईने घरी पैसे का पाठवत नाही असं विचारलं असता मुलाने सांगितले की, तो आपल्या एखा गरजू मित्राला पैसे देत आहे. नंतर तो आपल्याला पैसे परत करील.

दरम्यान, लोकसत्ताच्या 10 जानेवारी 2025 रोजी प्रकाशित वृत्तानुसार, तरुणाने त्याच्या आईकडून डेबिट कार्ड घेतले आणि सुमारे 25 हजार रुपये काढले. नंतरच त्याने घरातच आत्महत्या केली. कुटुंबाला माहित होते की तो तणावाखाली होता, परंतु तणावाचे नेमके कारण त्यांना ठाऊक नव्हते.

हेही वाचा – पुण्यात पतीच्या नपुंसकतेनंतर महिलेवर सासऱ्यासोबत शारीरिक संबंधासाठी दबाव; निवृत्त पोलिस अधिकारीसह तिघांवर गुन्हा

मृत तरुणाच्या बहिणीने त्याचा फोन तपासल्यावर प्रेयसीचा छळ आणि सततच्या पैशांच्या मागणीची माहिती समोर आली. तरुणाने आपल्या प्रेयसीला भेटवस्तू देऊन खुश ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु तिच्या मागण्या कधीच संपल्या नाहीत.

या सर्व प्रकारानंतर तरुणाच्या आईने आरोपी शबनमविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिस तपासानंतर प्राथमिक पुरावे मिळाल्यामुळे आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. मृत तरुणावर सातत्यपूर्ण आर्थिक दबाव आणि मानसिक ताण असल्याचे समोर उघडकीस आले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!