Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुण्यात पतीच्या नपुंसकतेनंतर महिलेवर सासऱ्यासोबत शारीरिक संबंधासाठी दबाव; निवृत्त पोलिस अधिकारीसह तिघांवर गुन्हा

पुण्यात पतीच्या नपुंसकतेनंतर महिलेवर सासऱ्यासोबत शारीरिक संबंधासाठी दबाव; निवृत्त पोलिस अधिकारीसह तिघांवर गुन्हा

पुणे: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत गुन्हेगारीच्या घटना सतत वाढत असून, महिलांवरील अत्याचाराचे प्रकरणे गंभीर स्वरूप धारण करत आहेत. सहकार नगर परिसरात समोर आलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण शहर हादरले आहे. एका महिलेने तिच्या पती, सासू आणि सासऱ्यांविरुद्ध छळ व अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे आरोपींपैकी सासरे हे निवृत्त पोलिस अधिकारी आहेत.

पतीची नपुंसकता उघड –

एफआयआरमधील तपशीलानुसार, पीडितेचे केवळ पाच महिन्यांपूर्वी लग्न झाले. मात्र, लग्नानंतर पतीची नपुंसकता समोर आली. त्यानंतर पती गौरव तांबे आणि सासू श्रद्धा तांबे यांनी पीडितेवर दबाव आणला की, जर तिला मूल हवे असेल तर तिला सासरे जयसिंग तांबे यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवावे लागतील. या मागणीमुळे पीडिता मानसिकदृष्ट्या खचली.

दरम्यान, 10 सप्टेंबरच्या रात्री प्रकरणाने भीषण वळण घेतले, जेव्हा सासरे घरात येऊन तिला लैंगिक संबंधांसाठी भाग पाडू लागले. विरोध केला असतानाही तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा आरोप पीडितेने केला आहे. अखेर, या अमानवी छळाचा कंटाळून तिने पोलिसांकडे धाव घेतली.

सहकार नगर पोलिसांनी तिघांविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. समाजात या घटनेमुळे संतापाची लाट उसळली असून, विशेषत: आरोपी सासरे हे निवृत्त पोलीस अधिकारी असल्यामुळे नागरिकांमध्ये आक्रोश व्यक्त केला जात आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कारवाई आणि जलद न्याय व्हावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!