Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime: पुण्यात खळबळ! कचऱ्यामध्ये आढळले अर्भक; पोलिसांकडून तपास सुरु

Pune Crime: पुण्यात खळबळ! कचऱ्यामध्ये आढळले अर्भक; पोलिसांकडून तपास सुरु

Pune Crime: पुण्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. पिंपळे निलख परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक दिवसाच्या मुलीचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांनी ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर सांगवी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृत अर्भक ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे.

हे स्त्री अर्भक कोणी, कुठून आणि कोणत्या कारणामुळे कचऱ्यात टाकले, याचा सखोल तपास सांगवी पोलीस करत आहेत. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, संबंधित सीसीटीव्ही फुटेज आणि परिसरातील माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे आजही समाजात मुलगी नकोशी समजली जाते, ही विदारक वास्तव परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली असून, परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा – Pune Porsche Accident: पुणे पोर्शे अपघात प्रकरणाबाबत मोठी अपडेट! विशाल अगरवालचा कोठडीतील मुक्काम वाढला

बारामतीत अल्पवयीन मुलीचे अपहरण; आरोपी अटकेत

दरम्यान, बारामती तालुक्यातील माळेगाव परिसरात एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी माळेगाव पोलिसांनी तातडीने कारवाई करत स्वप्निल उर्फ सोपान विश्वंबर पवार (वय 21) या तरुणाला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला फूस लावली आणि तिच्याशी गैरवर्तन केले. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आईने 4 डिसेंबर रोजी माळेगाव पोलीस ठाण्यात दाखल केली होती. तक्रार मिळताच पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि तपासाच्या आधारे मुलीचा शोध घेतला आणि तिला बीड येथून सुखरूप मुक्त केले. या प्रकरणात आरोपीविरोधात POCSO कायद्यानुसार गंभीर कलमे लावण्यात आली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे परिसरात चिंता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!