Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Baramati Extortion Attack: बारामतीत चायनीज हॉटेलचालकावर कोयत्याने हल्ला; हप्ता न दिल्याने राडा

Baramati Extortion Attack: बारामतीत चायनीज हॉटेलचालकावर कोयत्याने हल्ला; हप्ता न दिल्याने राडा

Baramati Extortion Attack: शहरातील प्रगतीनगर भागातील चिंचकर चौक येथे चायनीज हॉटेलचालकाने हॉटेल सुरू ठेवण्याच्या बदल्यात हप्ता न दिल्याच्या रागातून आठ जणांनी त्याच्यावर कोयत्याने हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली असून पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

शहरात खंडणीच्या प्रकरणातून घडलेल्या या घटनेची मोठी चर्चा आहे. हॉटेलचालकाला केलेली मारहाण आणि हॉटेलची केलेली तोडफोड सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आरोपींनी जाताना गल्ल्यातील 8 हजार 300 रुपयांची रोख रक्कम बळजबरीने नेली. शुक्रवारी (दि. 26) रात्री 8.30 वाजेच्या सुमारास फिर्यादी आकाश सिद्धनाथ काळे (रा. देसाई इस्टेट, बारामती) यांच्या चायनीज हॉटेलात ही घटना घडली.

याप्रकरणी हॉटेलचालक आकाश काळे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी विनायक मारक ऊर्फ मांबरी, राहुल चव्हाण, राज गावडे, आदित्य बगाडे, निहाल जाधव व विवेक (पूर्ण नाव नाही. सर्व रा. दादा पाटीलनगर, तांदूळवाडी, बारामती) यांच्यासह दोघा अनोळखी अशा आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला.

आकाश काळे हे चिंचकर चौकात आपले चायनीज या नावाचे हॉटेल चालवतात. मागील 15 दिवसांपूर्वी या आरोपींनी त्यांच्याकडे हॉटेल सुरू ठेवायचे असेल तर हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी दिली होती. फिर्यादीने त्यास नकार दिला. त्याचा राग मनात धरून या आरोपींनी फिर्यादीच्या हॉटेलात येत त्यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने हल्ला केला. हॉटेलच्या गल्ल्यात हात घालून त्यातील 8 हजार 300 रुपये रोख रक्कम दहशतीने काढून घेत शस्त्रांसह दरोडा टाकला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

गुन्ह्यातील काही जण सराईत

या गुन्ह्यातील काही आरोपी सराईत असून त्यांच्याविरोधात यापूर्वी पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. विनायक मारक ऊर्फ मांबरी व राहुल चव्हाण या दोघांवर 2018 मध्ये खुनासह अन्य गंभीर गुन्हे दाखल आहेत. गावडे, बगाडे, जाधव यांच्या विरोधातदेखील सन 2024 मध्ये काही गुन्हे दाखल आहेत.

 

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!