Today बुधवार, 28th ऑक्टोबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘मामाच्या गावाला आले, भेटायला ये’; तरुणीने जाळ्यात अडकवत साथीदारांच्या मदतीने तरुणाला लुटले

‘मामाच्या गावाला आले, भेटायला ये’; तरुणीने जाळ्यात अडकवत साथीदारांच्या मदतीने तरुणाला लुटले

श्रीगोंदा: ‘मामाच्या गावाला आले, भेटायला ये’ असे म्हणत तरुणीने भेटण्याच्या बहाण्याने जाळ्यात अडकवत पाच साथीदारांच्या मदतीने एका तरुणास लुटल्याची धक्कादायक घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, श्रीगोंदा तालुक्यातील चार व पुणे जिल्ह्यातील एक असे पाच मित्र आर्थिक अडचणीने त्रस्त होते. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काही तरी केले पाहिजे, या विचारात असतानाच श्रीगोंद्यातील एकाला फेसबुकवर सोन्याच्या ऐवजाचा फोटो दिसला. सोने खरे की खोटे याची खातरजमा करत असतानाच फोटो पोस्ट करणाऱ्याशी संपर्क साधला. त्यानंतर तरुणाच्या व्हॉटस्अॅपवर एका तरुणीचा ‘हाय’ मेसेज आला.

दोघांत चॅटींग सुरू झाले. तिने ओळखीच्या खाणाखुणा सांगितल्याने त्याचा तिच्यावर विश्वास बसला. तिने नाव, गाव सांगून स्वतःचा फोटोही शेअर केला. ‘मामाच्या गावाला आले, भेटायला ये, अशी गळ घातली. तरुणाला विश्वास बसल्याने तोही मित्राला सोबत घेत लागलीच तिला भेटायला निघाला, श्रीगोंदा शहरापासून काही अंतर जाताच पाठीमागून आलेल्या चारचाकीने त्याची गाडी अडविली. धमकी देत गळ्यातील सोन्याची चेन, अंगठी, मोबाईल असा ऐवज हिसकावत पोबारा केला.

हेही वाचा – Jalgaon crime : केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडेखोरांचा हल्ला, कर्मचाऱ्यांना मारहाण करून लाखोंची लूट

रस्ता लुटीची तक्रार तरुणाने श्रीगोंदा पोलिसांत दाखल करताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लुटारुंचा शोध सुरू केला. तपासात श्रीगोंदा शहरातील तरुणाचा गुन्ह्यात सहभाग असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. पोलिसानी त्याला ताब्यात घेत चौकशी सुरू केली, पण त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखविताच इतर मित्रांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली देतानाच मैत्रिणीने मदत केल्याचे सांगितले. त्याने दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काही तासात तिघांना गजाआड केले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!