सोलापूर : मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एका अज्ञात वाहन चालकाविरुध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना १४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सोलापूर-पुणे रोडवरील जुना पुना नाका येथील सर्विस रोड जवळील मडकी वस्ती येथे घडली. याप्रकरणी विजय संगप्पा बनसोडे (वय-३७, रा.वारद नगर, मडकी वस्ती, सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
यातील फिर्यादी यांचे वडील संगप्पा बनसोडे (वय-६०) हे पायी चालत जात होते. एस.टी.स्टँड ते राहत्या घराकडे परत येत असताना जुना पुना नाका येथील मडकी वस्ती येथे त्यांना एका अज्ञात वाहनचालकाने निष्काळजीपणाने वाहन चालवून धडक दिली. व वाहन न थांबवता, अपघाताची माहिती न देता पळून गेला. संगप्पा बनसोडे यांना जखमी करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला आहे, असे फिर्यादित नमूद आहे. पुढील तपास सपोनि पाटील हे करीत आहेत.


