कुपवाड : औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीच्या कार्यालयातून बारा लाखाच्या रकमेची तिजोरीच अज्ञाताने लंपास केली. याप्रकरणी कुपवाड पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत फिर्याद सूरज संभाजी कळंत्रे (वय ३४, रा. कांचनपूर, ता. मिरज, जि. सांगली) यांनी दिली.
कुपवाड येथील वसाहतीत भारत इलेक्ट्रिकल अँड मॅन्युफॅक्चर प्रा.लि नावाची कंपनी आहे. गुरुवार (ता. १९) सायंकाळ ते शुक्रवार (ता. २०) डिसेंबर या कालावधीत कंपनीच्या कार्यालयात कोणा अज्ञाताने प्रवेश केला. आतमध्ये बारा लाख पन्नास हजाराची रोकड असणारी लहान संपूर्ण लोखंडी तिजोरीच त्याने लंपास केली. प्रकार उघडकीस येताच कळंत्रे यांनी कुपवाड तक्रारीसाठी कुपवाड पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार कुपवाड पोलिसांत अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.


