Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pimpri Chinchwad Crime : पत्नी सोडून गेली, लेक दुरावली…फेसबुक लाईव्ह करत तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये केले गंभीर आरोप

Pimpri Chinchwad Crime : पत्नी सोडून गेली, लेक दुरावली…फेसबुक लाईव्ह करत तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये केले गंभीर आरोप

Pimpri Chinchwad Crime : पिंपरी-चिंचवडमधील भोसरी परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आपल्या पोटच्या मुलीचा आणि पत्नीचा विरह सहन न झाल्याने एका तरुणाने फेसबुक लाईव्ह करत मृत्यूला कवटाळले आहे. केशरी प्रसाद शाहू असे या मृत तरुणाचे नाव असून, भाजी मंडईच्या छतावरील पाण्याच्या टाकीवरून उडी मारून त्याने आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने संपूर्ण पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे.

फेसबुक लाईव्हमध्ये मांडली व्यथा: “मला जगायचं होतं…”
आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी केशरी प्रसादने सोशल मीडियावर एक लाईव्ह व्हिडिओ शेअर केला होता. सुमारे एक मिनिट सहा सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये तो प्रचंड रडताना दिसत आहे. ‘मला माझ्या पत्नीला भेटायचं आहे, मला माझं आयुष्य जगायचं आहे,’ अशा शब्दांत त्याने आपल्या मनातील आर्त हाक दिली. मात्र, काही क्षणातच त्याने मृत्यूचा मार्ग निवडला.

‘आय मिस यू दिव्यांशी’ : चिठ्ठीतील शब्दांनी पाणावले डोळे
पोलिसांना घटनास्थळी प्रसादने लिहिलेली तीन पानांची सुसाईड नोट सापडली आहे. या चिठ्ठीतील प्रत्येक शब्दातून त्याचे आपल्या मुलीवर असलेले अफाट प्रेम व्यक्त होत आहे. मृत्यूनंतर आपल्या चिमुकल्या मुलीनेच आपल्याला मुखाग्नी द्यावा किंवा आपले दफन करावे, अशी भावनिक इच्छाही त्याने पत्रात लिहिली आहे.

नेमकी घटना काय?
गेल्या काही महिन्यांपासून केशरी प्रसादची पत्नी मुलीला घेऊन वेगळी राहत होती. या एकाकीपणामुळे तो मानसिक नैराश्यात होता. काल दुपारी साडेचारच्या सुमारास तो भोसरी भाजी मंडईच्या दुसऱ्या मजल्यावरील टाकीवर चढला. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने धाव घेतली. जवानांनी तब्बल पाऊण तास त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने यश आले नाही. बघ्यांच्या अफाट गर्दीसमोर त्याने टाकीवरून थेट खाली उडी घेतली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!