Today गुरूवार, 17th सप्टेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

PCMC Mayor: पिंपरी-चिंचवडवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व; रवी लांडगे यांची महापौरपदी तर शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड

PCMC Mayor: पिंपरी-चिंचवडवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व; रवी लांडगे यांची महापौरपदी तर शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड

PCMC Mayor Election 2026 : उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या २७ व्या महापौरपदाची माळ अखेर भाजपचे रवी लांडगे यांच्या गळ्यात पडली आहे. विशेष म्हणजे, महापौर आणि उपमहापौर अशा दोन्ही महत्त्वाच्या पदांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या असून, भाजपने शहरातील आपले राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी दीपक तावरे यांनी शुक्रवारी या निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब केले.

विरोधकांची माघार आणि ‘बिनविरोध’चा मार्ग
या निवडणुकीत सुरुवातीला मोठी चुरस पाहायला मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती, मात्र प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी चित्र पूर्णपणे बदलले. महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) कोणताही उमेदवार रिंगणात न उतरवल्याने रवी लांडगे यांची निवड केवळ एक औपचारिकता ठरली. दुसरीकडे, उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या वैशाली काळभोर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र त्यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने भाजपच्या शर्मिला बाबर यांचा विजय सुकर झाला.

उपमहापौर निवडीत भाजपचे नाट्यमय ‘ट्विस्ट’
निवडणूक प्रक्रियेदरम्यान भाजपला अंतर्गत पातळीवर काही नाट्यमय घडामोडींना सामोरे जावे लागले. पक्षाने सुरुवातीला उपमहापौरपदासाठी शीतल उर्फ विजय शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. मात्र, शिंदे यांनी अचानक महापालिकेतून प्रस्थान केल्याने पेच निर्माण झाला. अशा परिस्थितीत भाजपने तातडीने रणनीती बदलून शर्मिला बाबर यांना संधी देण्याचा निर्णय घेतला. कोणताही गोंधळ उडू नये यासाठी अत्यंत गुप्ततेने ही प्रक्रिया पार पाडत भाजपने आपला गड राखला.

हेही वाचा – सुवर्णसंधी ! पुणे महानगरपालिकेत निघाली मेगा भरती; ऑनलाईन करता येणार अर्ज…

रवी लांडगे: लोकप्रियतेचा नवा विक्रम
नवनियुक्त महापौर रवी लांडगे यांच्या निवडीने पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात एक नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. सलग दोन वेळा ‘बिनविरोध’ नगरसेवक म्हणून निवडून येण्याचा मान मिळवल्यानंतर, आता महापौरपदीही त्यांची निवड बिनविरोध झाली आहे. १२८ पैकी ६५ पेक्षा जास्त जागा जिंकून सत्ता राखणाऱ्या भाजपच्या या कार्यकाळातील ते पहिले महापौर ठरले आहेत. त्यांच्या या ‘हॅट्ट्रिक’मुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या लोकप्रियतेची चर्चा रंगली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!