Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघाताचे गूढ उलगडले? 9 फेब्रुवारीला रोहित पवार करणार मोठा खुलासा

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघाताचे गूढ उलगडले? 9 फेब्रुवारीला रोहित पवार करणार मोठा खुलासा

Ajit Pawar Plane Crash : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला कारणीभूत ठरलेल्या विमान अपघाताबाबत आता संशयाचे धुके अधिक गडद होऊ लागले आहे. हा निव्वळ अपघात होता की घातपात? या प्रश्नाने राजकीय वर्तुळात खळबळ माजलेली असतानाच, पवार कुटुंबाकडे यासंदर्भात काही ‘खळबळजनक’ माहिती हाती लागल्याचे संकेत मिळत आहेत. आमदार रोहित पवार यांनी नुकत्याच केलेल्या एका विधानामुळे या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे.

नेमकी चर्चा कशामुळे सुरू झाली?
नुकतीच बारामतीमध्ये पवार कुटुंबाची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, रोहित पवार, पार्थ पवार, जय पवार आणि युगेंद्र पवार यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी अत्यंत सूचक वक्तव्य केले.

रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

रोहित पवार म्हणाले की, विमानात नक्की काय घडलं? अपघात कसा झाला? यावर मी 9 फेब्रुवारीनंतर सविस्तर बोलेन. अपघाताबाबत अनेक अनुत्तरित प्रश्न असून, त्याबाबत राज्य सरकार, केंद्र सरकार आणि संबंधित विमान कंपनीला जाब विचारला जाईल. सध्या या प्रकरणाची सीआयडी चौकशी सुरू असली, तरी कुटुंबाच्या मनात काही शंका असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.

हेही वाचा – Ajit Pawar : एकीकडे अजित पवारचं निधन अन् दुसरीकडे महापालिकेचा एक अजब निर्णय, पुण्यात नेमकं चाललंय काय?

अजितदादांचे स्मारक आणि कुटुंबाची भूमिका
विमान अपघाताच्या चौकशीसोबतच अजित पवारांच्या स्मरणाबद्दलही बैठकीत चर्चा झाली. रोहित पवार म्हणाले की, “अजितदादांचे एक भव्य स्मारक आणि संग्रहालय (म्युझियम) उभारण्याची संपूर्ण कुटुंबाची इच्छा आहे. त्यासाठी जागेची पाहणी करण्यात आली असून लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल. दादांच्या पश्चात शरद पवार साहेब आजही कुटुंबाचा आधारवड म्हणून खंबीरपणे पाठीशी उभे आहेत.”

राजकीय विलीनीकरणावर मौन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत विचारले असता, सध्या कुटुंबात कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे रोहित पवारांनी सांगितले. मात्र, ‘दादांची शेवटची इच्छा काय होती? युती की विलीनीकरण?’ यावर सध्या सुरू असलेल्या चर्चांबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला आणि ९ फेब्रुवारीलाच सर्व बाबी स्पष्ट होतील असे संकेत दिले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!