Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime: पुण्यात विकृतीचा कळस! PMP कंडक्टरकडून बसमध्येच अल्पवयीन मुलीचा विनयभंग; प्रवाशांनी नराधमाला धु धु धुतला

Pune Crime: पुण्यात विकृतीचा कळस! PMP कंडक्टरकडून बसमध्येच अल्पवयीन मुलीचा विनयभंग; प्रवाशांनी नराधमाला धु धु धुतला

Pune Crime: पुणे शहराची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या पीएमपी बसमध्येच सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कात्रज ते स्वारगेट या मार्गावर धावणाऱ्या बसमध्ये एका नराधम कंडक्टरने अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे केल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

बसमधील तो थरार…
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलगी बसमधून प्रवास करत असताना कंडक्टरने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. आरोपीने आधी तिला मोबाईल नंबर मागून त्रास दिला आणि त्यानंतर संधी साधून तिला अयोग्य स्पर्श करत तिचा विनयभंग केला. घाबरलेल्या मुलीने प्रसंगावधान राखून आरडाओरडा केल्यावर बसमधील प्रवासी धावून आले. प्रवाशांनी या विकृत कंडक्टरला पकडून चांगलेच धारेवर धरले आणि थेट सहकारनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीवर पोक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

६६ वर्षीय वृद्धाचे १० वर्षांच्या चिमुरडीसोबत गैरवर्तन
पुण्यातील दुसरी संतापजनक घटना सिंहगड रस्ता परिसरात घडली आहे. येथे एका १० वर्षांच्या निष्पाप मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी ६६ वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नराधम वृद्धाने केलेल्या या कृत्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मुलीने धाडसाने हा सर्व प्रकार आपल्या आईला सांगितल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. सिंहगड रस्ता पोलिसांनी याप्रकरणी तातडीने गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

प्रशासनाविरुद्ध नागरिकांचा रोष
एका बाजूला सार्वजनिक बसमधील कर्मचारीच सुरक्षिततेऐवजी भीतीचे कारण बनत आहेत, तर दुसरीकडे परिसरात ज्येष्ठ नागरिकांकडून अशा घटना घडत असल्याने पुणेकर चिंता व्यक्त करत आहेत. “प्रशासनाने बसमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही आणि मार्शल तैनात करावेत,” अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!