Today मंगळवार, 21st एप्रिल 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Unseasonal Rain: पुण्याला पावसानं झोडपलं! वादळी वारा, रस्त्यावर पाणी वरून टपोऱ्या गारांचा तडाखा

Pune Unseasonal Rain: पुण्याला पावसानं झोडपलं! वादळी वारा, रस्त्यावर पाणी वरून टपोऱ्या गारांचा तडाखा

Pune Unseasonal rain: ऐन ऊन्हाळ्यात गारांचा पाऊस पडल्यामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. कडाक्याच्या उन्हात पावसाने वातावरणात थोडासा थंडावा निर्माण झाला, पण आता पुणेकर उकाड्याने हैराण होतील. पुण्यात सकाळपासून ढगाळ वातावरण होतेच, पण दुपारी पुण्यातील पश्चिम भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक पडलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली.

पुण्यातील औंध, बाणेर, बालेवाडी, म्हाळुंगे या भागाला पावसाने झोडपले. पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यासह पिंपरी चिंचवड आणि राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. बाणेर येथे गारांचा जोरदार पाऊस सध्या सुरू आहे. अचानक पाऊस पडल्यामुळे पुणेकरांची धांदल उडाली.

पिंपरी चिंचवडमध्ये अवकाळीचा तडाखा

भर उन्हाळ्यात पिंपरी चिंचवड शहरातही अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. शहरात आज दुपारी रिमझिम पावसाला सुरुवात झाली. भर उन्हाळ्यात पिंपरी चिंचवड शहरात ढगाळ वातावरणासह रिमझिम पावसाच्या सरी पडू लागल्याने पिंपरी चिंचवडकरांना कडाक्याच्या उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळाला आहे. अचानक पाऊस पडल्याने नागरिकांची मात्र तारांबळ उडाली.

धुळ्यात अवकाळी पावसाचा तडाखा –

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. रिमझिम पावसाला साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरात सुरुवात झाली आहे. हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. या अवकाळी पावसामुळे कांदा, गहू, हरभरा, मका पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.

अवकाळी पाऊस, गारपीटमुळे गव्हाचे नुकसान

नाशिक जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी मालेगाव,चांदवड,येवला तालुक्यातील काही गावात गारपीट,अवकाळी पाऊस व वादळ आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. चांदवड तालुक्यात झालेल्या वादळी वारा व पावसाने भडाने येथील शेतकऱ्याचा वादळी वारा व पावसाने काढणीला आलेल्या गहू शेतात आडवा झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. आठवडाभरात दुसऱ्यांदा चांदवड तालुक्यातील विविध भागांना पावसाने झोडपल्याने शेतकरी त्रस्त झाला असून हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने बळीराजा चिंतेत पडला आहे.

रत्नागिरी जिल्ह्याला २ एप्रिल पर्यंत यलो अलर्ट

हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्यात ३१ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत ‘यलो अलर्ट’ जाहीर केला आहे. या कालावधीत वादळी वारा, विजांचा कडकडाट, गारपिटीसह मान्सूनपूर्व पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविली आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस उष्णतेच्या लाटेसोबत अचानक हवामान बदलून मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिल्याने जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदार धास्तावले आहेत. जिल्ह्यात या तीन दिवसात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहणे, विजांचा कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही ठिकाणी गारपीटही होण्याचा अंदाज आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!