Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘पोलीस कर्मचाऱ्यानेचं भावाला सक्षमला संपवण्यासाठी…’; प्रियकराच्या हत्येनंतर प्रेयसी आंचलचा धक्कादायक खुलासा

‘पोलीस कर्मचाऱ्यानेचं भावाला सक्षमला संपवण्यासाठी…’; प्रियकराच्या हत्येनंतर प्रेयसी आंचलचा धक्कादायक खुलासा

Nanded Crime News: नांदेडच्या इतवारा भागात घडलेल्या आंतरजातीय प्रेमप्रकरणातील हत्येमुळे जिल्हा हादरला आहे. गुरुवारी 20 वर्षीय सक्षम ताटे याची निर्घृण हत्या करण्यात आली असून, या घटनेने राज्यभर खळबळ उडाली आहे. सक्षमच्या मृत्यूनंतर त्याची प्रेयसी आंचल मामीडवारने मृतदेहाशी लग्न करून सर्वांना चकित केले. आता आंचलने पुढे येऊन या हत्येच्या संपूर्ण पार्श्वभूमीचा खुलासा करत कुटुंबीयांसह एका पोलीस कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप लावले आहेत. तिच्या म्हणण्यानुसार, सक्षमची हत्या “प्रेमामुळे आणि जातीय द्वेषातून” घडवून आणली गेली.

आंचलने सांगितले की, घटनेच्या दिवशी तिचा लहान भाऊ तिला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेला आणि सक्षमविरुद्ध तक्रार दाखल करण्याचा दबाव टाकू लागला. ‘मी पोलिसांसमोर स्पष्ट सांगितले की सक्षमवर कोणताही गुन्हा दाखल करायचा नाही.’ यावेळी पोलिसात कार्यरत असलेले धीरज कोमलवार यांनी तिच्या भावाला सक्षमला मारण्याचा सल्ला दिला, असा खळबळजनक आरोप आंचलने केला आहे. तिच्या म्हणण्यानुसार, कोमलवार यांनी तिच्या भावाला उद्देशून म्हटले, “रोज भांडणं करून इथे येतोस… ज्या मुलासोबत तुझ्या बहिणीचं प्रकरण आहे, त्यालाच संपवून ये!”

हेही वाचा – आंतरजातीय प्रेमसंबंधातून तरूणाची हत्या; प्रेयसीकडून वडिल आणि भावाच्या फाशीची मागणी, नांदेडमध्ये ह्रदय पिळवटून टाकणारी घटना

यानंतर आंचलचा भाऊ संतापाच्या भरात बोलला, “त्याला मरूनच इथं येतो…” आणि काही तासांतच सक्षमची हत्या झाली, असे आंचलने सांगितले. आंचल आणि सक्षम गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. मात्र जातिव्यवस्थेचा अडथळा आंचलच्या कुटुंबीयांनी उभा केला. सक्षम काही दिवसांपूर्वीच कारावासातून बाहेर आला होता. त्यानंतर कुटुंबीय सक्षमच्या जीवाला धोका निर्माण करत असल्याचे आंचलने सांगितले.

आंचल म्हणाली, माझे वडील आणि भाऊ त्याला मारण्यासाठी कट रचत होते. त्यांनी सक्षमला ठार मारलं, पण ते हरले… कारण सक्षम मरूनही जिंकला. तिने पुढे मागणी केली की, तिच्या वडिलांना आणि भावाला कठोर फाशीची शिक्षा दिली जावी. या प्रकरणात पोलिसांनी आंचलचे वडील गजानन मामीलवाड यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!