Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

आंतरजातीय प्रेमसंबंधातून तरूणाची हत्या; प्रेयसीकडून वडिल आणि भावाच्या फाशीची मागणी, नांदेडमध्ये ह्रदय पिळवटून टाकणारी घटना

आंतरजातीय प्रेमसंबंधातून तरूणाची हत्या; प्रेयसीकडून वडिल आणि भावाच्या फाशीची मागणी, नांदेडमध्ये ह्रदय पिळवटून टाकणारी घटना

नांदेड: पुरोगामी महाराष्ट्राला हादरावून सोडणारी घटना नांदेडमध्ये घडली आहे. प्रेम संबंधाला विरोध असल्याने मुलीच्या वडील आणि भावाने मिळून तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे. या हत्येनंतर मुलीने आपल्या वडिलांना आणि भावाला फाशी द्या, अशी मागणीच केली आहे. धक्कादायक म्हणजे, प्रियकराच्या पार्थिवाशी तिने लग्न केलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेडमध्ये ही घटना घडली. 25 वर्षीय सक्षम ताटे आणि 21 वर्षीय आंचल मामीडवार या दोघांचे प्रेमसंबंध होते. आंतरजातीय प्रेमसंबंधाला आँचलच्या भावाचा आणि वडिलांचा विरोध होता. ‘तू दुसरा कुणीही आण पण हा नकोच! असं वारंवार सांगितलं गेलं. त्याला मारून टाकू अशीही धमकी देण्यात आली आणि तसं करूनही दाखवलं. आँचलच्या भावाने आणि वडिलांनी मिळून सक्षमला गोळ्या झाडून मारलं, त्याची हत्या केली.

सक्षमवर गोळ्या झाडल्या अन् दगडाने चेहरा ठेचला

25 वर्षीय सक्षम ताटे आणि 21 वर्षीय आंचल मामीडवर या दोघांचे प्रेमसंबंध होते. सक्षम ताटे आणि आँचलचा भाउ हिमेश मामीडवार दोघे मित्र होते. दोघांची गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे. दीड महिन्यापूर्वी समक्ष जामिनावर सुटून आला होता. सक्षम आणि आँचलच्या प्रेम संबंधाची माहिती आँचलचे वडील गणेश मामीडवार यांना लागली. सक्षम दुसऱ्या जातीतला असल्याने या प्रेमाला आँचलच्या वडील आणि भावांचा विरोध होता. याच कारणातून आँचलचे वडील गणेश मामीडवार आणि भाऊ हिमेश आणि साहिल सोबत अन्य दोघांनी गुरूवारी रात्री नांदेड शहरांतील जुना गंज भागात सक्षम ताटे या तरुणाची गोळ्या झाडून आणि दगडाने ठेचून हत्या केली.

आँचलने केलं सक्षमच्या पार्थिवासोबत लग्न

शुक्रवारी सक्षमवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी प्रेयसी आंचल मामीडवार हिने सक्षम सोबतच लग्न करणार असा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे आंचलने सक्षमच्या पार्थिवदेहाला हळद आणि कुंकू लावून लग्न केलं. “आमच्या प्रेम संबंधाला विरोध असल्याने माझ्या वडिलांनी भावाने मारलं. पण, ते हरले आणि माझा प्रियकर मरून पण जिंकला. माझ्यावर कुणाचीही जोर जबरदस्ती नाही. मी माझ्या वडिलांना आणि भावाला जिंकू देणार नाही. मी सक्षमची आहे आणि शेवटपर्यंत सक्षमचीच बनून राहणार’ असं म्हणत आँचलने टाहो फोडला. तसंच, प्रियकराच्या मृत्यूनंतरही मी त्याचीच राहणार असा, निर्धार तरुणीने केला.

दरम्यान, आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आँचलने केली. दरम्यान, या खून प्रकरणी इतवारा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. आँचलच्या वडील आणि भावासह अन्य दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!