Today सोमवार, 21st सप्टेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

संतापजनक! पुण्यातील विठ्ठल भक्तांना पंढरपुरमध्ये मारहाण; व्हिडीओ व्हायरल, तिघांविरोधात गुन्हा दाखल

संतापजनक! पुण्यातील विठ्ठल भक्तांना पंढरपुरमध्ये मारहाण; व्हिडीओ व्हायरल, तिघांविरोधात गुन्हा दाखल

Pandharpur Crime: आपल्या समाजात वारकऱ्यांना वेगळच स्थान आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी पुण्याहून पंढरपुरात आलेल्या चार भाविकांना काही दुल्लडबाजांनी मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली. भाविकांना मारहाण करतानाचा आरोपींचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी तीन जणांविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप महादेव पाटील (वय 69, रा. पुणे) व त्यांचे मित्र दिलीप वर्णे, नंदकिशोर मोरे, राऊतआप्पा चलवादी व इतर 29 असे 33 लोक सर्व (रा. पुणे) हे पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन पश्चिमद्वार येथे फोटो काढत होते.

 

नेमक काय घडलं?

एक अनोळखी इसम दुचाकी गाडीवरून येऊन शिवीगाळ करून तेथून निघून गेला. त्यानंतर पश्चिमद्वार येथून पुढे चौफाळ्याकडे येत असताना भांड्याच्या दुकानासमोर त्याच्यासोबत अजून दोन अनोळखी इसमांना सोबत घेऊन आला. तेव्हा दिलीप वर्णे यांनी त्या अनोळखी इसमास तुम्ही आम्हाला शिवीगाळ का केली? असे विचारले. त्यानंतर त्यातील स्वप्निल अहिरे नावाच्या इसमाने तेथील सिमेंटचा ब्लॉक हातात घेऊन त्यांच्या डोक्यात मारला. यात ते गंभीर जखमी झाले.

त्यानंतर त्याने चलवादी यांच्याही पायावर जोरात मारले. त्यात ते जखमी झाले. तेव्हा प्रदीप पाटील व नंदकिशोर मोरे असे मधे गेले. त्यानंतर माऊली लोंढे याने तेथेच असलेल्या चहाच्या टपरीजवळील स्टीलची बकेट हातात घेऊन प्रदीप पाटील यांच्या पाठीत व मोरे यांच्या हातावर मारून जखमी केले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!