Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime: पश्चिम बंगालमधल्या तरुणींवर पुण्यात अत्याचार, ब्युटी पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय प्रवृत्त

Pune Crime: पश्चिम बंगालमधल्या तरुणींवर पुण्यात अत्याचार, ब्युटी पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय प्रवृत्त

पुणे: पुण्यात गुन्हागारीने उच्च्छाद मांडला आहे. परराज्यातून तरूणींना नोकरीचे आमीष दाखवले जाते आणि त्यांना इथे वेश्याव्यावसाय करण्यास भाग पाडले जात अल्याचे अनेक घटनांवरून समोर आले आहे. त्यातच आणखी एक घटना समोर आली आहे ती पश्चिम बंगालहून. दोन तरुणींना पुण्यात आणून वेश्याव्यवसायास प्रवृत्त करणाऱ्या दलालाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. तरूणींचा ओशख जाहीर करण्यात आली नाही. मात्र, त्या २२ वर्षांच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांनी या कारवाईत दोन पीडित तरुणींची सुटका केली असून, आरोपीला ताब्यात घेतले आहे.गुन्ह्यात साथ देणारी त्याची पत्नी फरार आहे. तरूणींची तक्रारीत सांगितल्या प्रमाणे त्यांनी दोन वर्षे छळ सहन केल्यानंतर अखेर संधी मिळताच तरुणींनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून आपल्यावर झालेला छळ सांगितला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने छापा टाकून त्यांची सुटका केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राजू असे असून, त्याची पत्नी मीरा हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीरा सध्या फरार असून, पोलिस तिचा शोध घेत आहेत. याबाबत 22 वर्षांच्या एका तरुणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गेल्या आठवड्यात आंबेगाव पठार परिसरातून अशीच घटना समोर आली होती. तरूणीला अशाच पद्धतीने वेश्याव्यवसायास प्रवृत्त केले. मात्र, या तरुणीने धाडस दाखवत पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. तिच्या दिलेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांनी विशेष पथकाला छापा टाकण्याचे आदेश दिले. पोलिसांनी तातडीने छापा टाकून आरोपीच्या ताब्यातून फिर्यादी तरुणीसह दोन्ही तरुणींची सुटका केली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!