Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानास मुदतवाढ मिळावी; सरपंच संघटनेची राज्य सरकारकडे मागणी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानास मुदतवाढ मिळावी; सरपंच संघटनेची राज्य सरकारकडे मागणी

मुंबई: राज्यातील अखिल भारतीय सरपंच परिषदेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला’ मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. या संदर्भात परिषदेने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना औपचारिक निवेदन पाठवले आहे. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, हा उपक्रम मोठ्या उत्साहात सुरू झाला होता. ग्रामविकास विभाग, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच सरपंच यांनी गावागावात जनजागृती मोहिमा राबवल्या. मात्र, अलीकडील अतिवृष्टी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता हे अभियान नियोजित वेळेत पूर्ण करणे कठीण ठरत आहे.

राज्यातील २५ जिल्हे आणि २०० हून अधिक तालुके अतिवृष्टीग्रस्त असल्याने स्थानिक सरपंच, ग्रामसेवक आणि तलाठी हे पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत, पंचनामे आणि नुकसान भरपाई या कामात व्यस्त आहेत. नोव्हेंबर महिन्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका होणार असल्याने गावपातळीवरील कार्यकर्ते आणि शासकीय अधिकारी निवडणुकीच्या तयारीत गुंतलेले आहेत. त्यामुळे अभियानात अपेक्षित प्रमाणात सहभाग मिळणे शक्य नाही, असे परिषदेने म्हटले आहे.

हेही वाचा – भाजप मराठवाड्यात स्वबळावर निवडणूक लढणार? मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या बैठकीत नक्की काय चर्चा झाली?

अभियानाचा कालावधी १७ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ असा निश्चित करण्यात आला होता. मात्र, प्रतिकूल हवामान, पूरस्थिती आणि निवडणुका यामुळे हा कालावधी वाढवून किमान एक महिना, शक्य असल्यास मार्च अखेरपर्यंत मुदत देण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, राज्यातील बहुतेक सरपंच या मुदतवाढीच्या बाजूने असून, त्यामुळे अभियानाचे उद्दिष्ट अधिक प्रभावीपणे साध्य होईल आणि ग्रामविकास प्रक्रियेला गती मिळेल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!