मुंबई : गेल्या महिन्यात पावसामुळे राज्यात पूरस्थिती निर्माण झाली. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला. अनेकांच्या शेतपिकाचे, घराचे, जनावरांचे नुकसान झाले. तर काहीची शेती अक्षरश: खरडून गेली. परिस्थीती अजून व्यवस्थित नाही झाली. नुकतीच राज्य सरकारने अतिवृष्टी आणि पूरग्रस्त तालूक्यांची यादी जाहीर केली. त्या भागातील शेतकऱ्यांना मदत पूरवली जाणार आहे. एनडीआरएफने दिलेल्या माहितीच्या आधारी पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत पूरवली जणार आहे.
त्यावरून आता राज्यात राजकारण सुरू झाले आहे. उद्धव ठाकरे हे संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. ते तेथील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून त्यांची भेट घेत आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंनी हंबरडा मोर्चा सुरू केला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून ‘कधी घराचा उंबरठा न ओलंडणारे आता हंबरडा फोडत आहेत’, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटल आहे.
शेतकऱ्यांना भरीव मदत केली
उद्धव ठाकरे यांच्या हंबरडा मोर्चाला एकनाथ शिंदे यांनी उशिरा सुचलेलं शहाणपण म्हटलं. आम्ही शेतकऱ्यांच्या बांधा-बांधावर आम्ही जाऊन आलो. प्रत्यक्ष जाऊन तिथली परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू आम्ही पुसले. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ राहीलो. आतापर्यंतच्या इतिहासात इतकी मदत शेतकऱ्याला कधीच मिळाली नव्हती. 32 हजार कोटींचं पॅकेज आम्ही जाहीर केलं. शेतकऱ्यांची दिवाळी गोड जावी म्हणून दिवाळी पूर्वी त्यांच्या खात्यात पैसे जमा केले. आम्ही 47 हजार हेक्टरी मदत केली. जमीन खरडून गेलेल्या लोकांना पुन्हा मनरेगाच्या माध्यमातून 3 लाख रुपये हेक्टरी असे 3 लाख 47 हजार रुपये मदत केली.


