Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! वाहतूक कोंडीवर तोडगा निघणार; शहरातील जुने भुयारी मार्ग रुंद होणार

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! वाहतूक कोंडीवर तोडगा निघणार; शहरातील जुने भुयारी मार्ग रुंद होणार

पुणे: पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पुणे महापालिकेने आरटीओ चौक आणि मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकादरम्यानच्या जुन्या आणि अरुंद भुयारी मार्गाचे रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. दररोज या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक होते कारण येथे पुणे रेल्वे स्टेशन, ससून रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि आरटीओ यांसारखी महत्त्वाची ठिकाणे आहेत. हा भुयारी मार्ग जवळपास 100 वर्षांपूर्वी बांधला गेला असून, सध्या त्याची रुंदी फक्त 5 मीटर आहे. त्यामुळे एकावेळी फार कमी वाहनच या मार्गातून जाऊ शकतात. कमी रुंदीमुळे मोठ्या ट्रकांना मालधक्क्याकडे जाण्यास अडचण येते, परिणामी दोन्ही चौकांत वाहतूक कोंडी सतत राहते. तसेच रेल्वे स्टेशनला जाताना अनेक नागरिक या कोंडीत अडकतात.

भुयारी मार्ग रुंद करण्याचा प्रस्ताव

महापालिकेने या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून भुयारी मार्ग रुंद करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे पत्र पाठवून जागा वापरण्याची परवानगी मागितली आहे. आरटीओकडून मंगळवार पेठेकडे जाणाऱ्या बाजूस नऊ ते दहा मीटर रुंदीचा नवीन भुयारी मार्ग बांधता येईल. याशिवाय सध्याचा जुना मार्गही मोठा करून रुंदी वाढवण्याचा विचार आहे. परिणामी दोन्ही बाजू मिळून जवळपास 20 मीटर रुंदीचा बोगदा तयार होईल.

हेही वाचा – कर्जत ते नेरळ मार्गादरम्यान विशेष ब्लॉक! मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक विस्कळीत होणार

दरम्यान, महापालिका प्रकल्प विभागाने सल्लागार नियुक्त करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. निवड झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत सल्लागार संस्था संपूर्ण आराखडा सादर करेल. या आराखड्यात भुयारी मार्गाची रचना, आवश्यक जागेचे मापन, कामाचा अंदाजे खर्च आणि पद्धत यांचा सविस्तर तपशील असेल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आरटीओ चौक आणि शाहीर अमर शेख चौकातील वाहतूक कोंडी कमी होईल. यामुळे वाहनांची हालचाल अधिक वेगवान आणि सुरक्षित होईल. तसेच नागरिकांना स्टेशन, ससून रुग्णालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाण्याचा मार्ग अधिक वेगवान होईल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!