नागपूर: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना अमित शहा यांनी दिल्लीत बोलावल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये मंत्रिमंडळात परतण्याची आशा निर्माण झाली आहे, तर पक्षातील विरोधकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. तथापी, मुनगंटीवार यांनीही दुजोरा दिला की, त्यांना अमित शहा यांचे बोलावणे मिळाले आहे. परंतु बैठकीचा अजेंडा माहित नसल्यामुळे त्यांनी यावर अधिक काही बोलणे टाळले. मुनगंटीवार हे भाजपमधील ज्येष्ठ नेते असून, देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात राज्याचे वित्त मंत्री आणि वन व सांस्कृतिक खाते हाताळले आहे.
पक्षातील संघर्ष आणि मागील अपयश
महायुतीच्या आधीच्या कार्यकाळात मुनगंटीवार यांना महत्त्वाची जबाबदारी देण्याची अपेक्षा होती, मात्र पक्षात चाललेल्या चढाओढीमुळे त्यांना बाजूला ठेवण्यात आले. ते गडकरी समर्थक म्हणून ओळखले जातात आणि महायुतीच्या सरकारमध्ये गडकरी यांना मुख्यमंत्री करावे, अशी मागणी त्यांनी केली होती.
हेही वाचा – Ajit Pawar : पंचनाम्याचा प्रस्ताव द्या, केंद्र मदत करेल, अमित शाहांकडून वचन; अजित पवार नेमकं काय म्हणाले?
मुनगंटीवारांना चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी देण्यात आली, परंतु लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे अनेक उमेदवार, त्यात मुनगंटीवारही पराभूत झाले. तथापी, मुनगंटीवार विधानसभेत पुन्हा निवडून आले, तरीही त्यांना मंत्रिमंडळापासून दूर ठेवले गेले. तथापी, आता अचानक अमित शहा यांनी त्यांना दिल्लीत बोलावले. त्यामुळे त्यांच्या बाबतीत मोठा राजकीय निर्णय होऊ शकतो. तसेच मुनगंटीवारांना पुन्हा मंत्रिमंडळात सामील करण्यात येईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


