नवी दिल्ली : ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ (एसबीआय) ने ३० नोव्हेंबरनंतर Online SBI आणि Yono Lite वर mCash पाठवण्याची सुविधा बंद करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ही सेवा बंद झाल्यानंतर ग्राहक लाभार्थी नोंदणीशिवाय पैसे पाठवण्यासाठी किंवा एमकॅश लिंक किंवा अॅपद्वारे पैसे दावा करण्यासाठी एमकॅश वापरू शकणार नाहीत.
SBI ने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये, एसबीआयने त्यांच्या ग्राहकांना थर्ड पार्टी लाभार्थ्यांना पैसे हस्तांतरित करण्यासाठी UPI, IMPS, NEFT आणि RTGS सारख्या इतर सुरक्षित वापरल्या जाणाऱ्या डिजिटल पेमेंट पर्यायांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. ३० नोव्हेंबर २०२५ नंतर ऑनलाइन एसबीआय आणि योनो लाईटवर एमकॅश (पाठवणे आणि दावा करणे) सुविधा उपलब्ध राहणार नाही. थर्ड पार्टी लाभार्थ्यांना निधी हस्तांतरित करण्यासाठी यूपीआय, आयएमपीएस, एनईएफटी, आरटीजीएस इत्यादी पर्यायी व्यवहार चॅनेल वापरावे लागतील.
गुगल प्ले स्टोअरवरून एसबीआय एमकॅश अॅप डाउनलोड केल्यानंतर, लॉग इन करण्यासाठी एम-पिन नोंदणी करा. ग्राहक आता एम-पिन वापरून एसबीआय एमकॅश अॅपमध्ये लॉग इन करू शकतात. स्टेट बँकेचे ग्राहक पासकोड वापरून एमकॅश वापरून दाव्याची रक्कम हस्तांतरित करू शकतात.


