मुंबई: एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. जे ग्राहक या बँकेचे अॅप वापरतात किंवा ऑनलाईन सेवा वापरतात, त्यांच्यासाठी बँकेकडून एक निवेदन जारी करण्यात आले असून बँकेच्या अनेक सेवा १६ तास बंद राहणार आहेत. यामध्ये व्हॉटसअॅपद्वारे चॅट, बँकिंग, एसएमएस बँकिंग, टोल फ्री बँकिंग आणि फोन बँकिंग आयव्हीआरसारख्या सुविधा बंद राहतील.
बँकेच्या म्हणण्यानुसार, ही देखभाल २४ जानेवारी रोजी रात्री १० वाजल्यापासून सुरू होईल आणि २५ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता पूर्ण होईल. अशा प्रकारे, या संपूर्ण कालावधीत अनेक बँकिंग सेवा प्रभावित होतील.


