Gold Rate Today : सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोन्याच्या दरात आज पुन्हा मोठी घसरण झाली असून ग्राहकांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर सातत्याने कमी होत आहेत. मागील दोन आठवड्यांत दरात मोठी घट झाली असून काही दिवसांतच सोनं २४ हजार रुपयांहून अधिक स्वस्त झाले आहे. कालच्या तुलनेतही आज दरात पुन्हा घट नोंदवली गेली आहे.
२४ कॅरेट सोन्याचे दर
२४ कॅरेट सोन्याच्या दरात १० तोळ्यामागे तब्बल २९,४०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे १० तोळ्यांसाठी सध्या १४,०३,५०० रुपये मोजावे लागत आहेत. प्रति तोळा दर २,९४० रुपयांनी कमी होऊन १,४०,३५० रुपये झाला आहे. तर ८ ग्रॅमसाठी दर १,१२,२८० रुपये इतका झाला आहे.
२२ कॅरेट सोन्याचे दर
२२ कॅरेट सोन्याचा प्रति तोळा दर १,२८,६५० रुपयांवर आला असून त्यात २,७०० रुपयांची घट झाली आहे. १० तोळ्यांसाठी दर १२,८६,५०० रुपये झाला आहे. ८ ग्रॅमसाठी दर १,०२,९२० रुपये इतका आहे.
१८ कॅरेट सोन्याचे दर
१८ कॅरेट सोन्याच्या दरातही घसरण झाली असून प्रति तोळा दर १,०५,२६० रुपये झाला आहे. १० तोळ्यांसाठी हा दर १०,५२,६०० रुपये असून ८ ग्रॅमसाठी ८४,२०८ रुपये दर आहे.
सोन्याचे दर घसरल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून, लग्नसराईच्या हंगामात खरेदीसाठी ही योग्य वेळ असल्याचे जाणकारांचे मत आहे.


