मुंबई : शेअर मार्केटमध्ये सातत्याने चढउतार पाहिला मिळत आहे. त्यात मल्टीबॅगर स्टॉकची मोठी यादी समोर आली आहे. यापैकी अनेकांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना खूप कमी वेळात मालामाल बनवले आहे. संरक्षण क्षेत्रातील कंपनी अपोलो मायक्रो सिस्टम्सच्या स्टॉकने असाच एक पराक्रम केला आहे. ज्यामध्ये गुंतवणूकदारांचे पैसे फक्त सहा महिन्यांत दुप्पट झाले आहेत.
गेल्या पाच वर्षांत या स्टॉकने गुंतवणूकदारांना २००० टक्क्यांहून अधिक बंपर परतावा दिला आहे. आठवड्याच्या दिवशीही वेगाने व्यवहार करताना दिसला. अपोलो मायक्रो सिस्टम्स ही इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रोमेकॅनिकल सिस्टीमच्या पुरवठ्यात गुंतलेली कंपनी आहे आणि त्यात क्षेपणास्त्र कार्यक्रमांमध्ये (आर्म्स सिस्टम इलेक्ट्रॉनिक्स), पाण्याखालील क्षेपणास्त्र कार्यक्रम, एव्हिओनिक सिस्टीम, पाणबुडी सिस्टीममध्ये वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांचे डिझाइन, विकास, वितरण समाविष्ट आहे.
दरम्यान, हा डिफेन्स स्टॉक २७५.२५ रुपयांवर उघडला आणि नंतर २९०.८० रुपयांवर पोहोचला. शेअरमध्ये वाढ झाल्यामुळे कंपनीच्या मार्केट कॅपमध्येही वाढ झाली आणि ती ९२४० कोटी रुपये झाली. अपोलो मायक्रो सिस्टिम्सच्या शेअरने फक्त सहा महिन्यांत चमत्कार केले आहेत आणि त्याच्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. या काळात गुंतवणूकदारांना १४०.२५ टक्के इतका जबरदस्त परतावा मिळाला आहे.


