Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

उद्योगपती अनिल अंबानींच्या ‘रिलायन्स’चे कोसळले शेअर्स; ‘ईडी’च्या कारवाईनंतर मोठी घडामोड…

उद्योगपती अनिल अंबानींच्या ‘रिलायन्स’चे कोसळले शेअर्स; ‘ईडी’च्या कारवाईनंतर मोठी घडामोड…

मुंबई : उद्योगपती अनिल अंबानींच्या कंपन्यांचे शेअर्स पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले. रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्यांच्या शेअर्समध्ये अचानक पुन्हा लक्षणीय घसरण झाली. मंगळवारी रिलायन्स पॉवरचे शेअर्स ७.७२ टक्के घसरून बंद झाले, तर रिलायन्स इन्फ्रा शेअर्स ५ टक्के घसरून बंद झाले.

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपची सुमारे ७५०० कोटींची मालमत्ता जप्त केली. त्यानंतर अनेक घडामोडी समोर आल्या आहेत. बुधवारी भारतीय शेअर बाजार बंद होता. मात्र, मंगळवारी ही मोठी घडामोड दिसून आली. मागील ट्रेडिंग दिवशी शेअर बाजार लक्षणीय घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स ५०० अंकांपेक्षा जास्त खाली होता, तर निफ्टी १६० अंकांपेक्षा जास्त खाली होता. अनिल अंबानींचे शेअर्स झपाट्याने घसरले. रिलायन्स पॉवरचे शेअर्स ७.७२ टक्क्यांनी घसरून ४०.५० वर बंद झाले. तर रिलायन्स इन्फ्राचे शेअर्सही ५ टक्क्यांनी घसरून १९४.९० वर बंद झाले.

सक्तवसुली संचालनालयाने गेल्या काही दिवसांत अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाच्या सुमारे ७५०० कोटींच्या मालमत्तेवर जप्ती केली आहे. हे जप्तीचे आदेश ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी पीएमएलएच्या कलम ५(१) अंतर्गत जारी करण्यात आले होते. रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (आरएचएफएल) आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड (आरसीएफएल) यांनी उभारलेल्या सार्वजनिक निधीच्या गैरवापराशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात ४० हून अधिक मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त करण्यात आल्या आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!